एकीकडे असं म्हटलं जातं की 'प्रेमामध्ये सर्व काही माफ असतं' पण दुसरीकडे जात, धर्म या गोष्टीच प्रेमाला अडथळा ठरतात. याच संघर्षात अनेकांचे जन्मदाते त्यांच्यापासून दुरावतात, नातेवाईक तुटतात आणि एकटेपणाही येतो. आज 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने आपण जाणून घेणार आहोत अशाच एका जोडप्याची कहाणी ज्या जोडप्याने जात, धर्म असे अडथळे झुगारत भरपूर संघर्षाला तोंड देत त्यांच्या 'प्रेमाची गोष्ट' यशस्वी केली.